विशेष JTO, LICE चे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. कारण PWD (दिव्यांग) आरक्षणाची मागणी करणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेल्या केसमध्ये नवी दिल्ली येथील प्रिन्सिपल CAT ने निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. हे प्रकरण 31-01-2023 रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध होते. मात्र, त्यादिवशी ते सुनावणीसाठी आले नाही कारण, या खटल्यापूर्वी बरीच प्रकरणे सूचीबद्ध होती. त्यामुळे न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी ०७-०२-२०२३ पर्यंत पुढे ढकलली आहे. आम्हाला आशा आहे की त्या दिवशी रोख (stay) हटवली जाईल. स्थगिती हटवल्या शिवाय व्यवस्थापन निकाल जाहीर करू शकत नाही. तसे केल्यास, सीएमडी बीएसएनएलला "न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईला" सामोरे जावे लागेल. या प्रकरणाशी संबंधित प्रकरणाची ही वस्तुस्थिती आहे. परंतु बीएसएनएलईयू निकाल जाहीर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. कॉम्रेड्सना विनंती आहे की खोट्या प्रचाराकडे दुर्लक्ष करावे.
सादर.
-पी.अभिमन्यू, जीएस.