BSNLEU चे संस्थापक महासचिव व AIBDPA चे अध्यक्ष कॉम वी ए एन नम्बोदरी व श्रीमती पंकजाम नम्बोदरी यांचा यथोचित सत्कार BSNLEU महाराष्ट्र व मुंबई जिल्हा यांच्या वतीने संयुक्तिक रित्या करण्यात आला.

25-01-23
1 Min Read
By BSNLEU MH
144
WhatsApp Image 2023-01-25 at 11

BSNLEU चे संस्थापक महासचिव व AIBDPA चे अध्यक्ष कॉम वी ए एन नम्बोदरी व श्रीमती पंकजाम नम्बोदरी यांचा यथोचित सत्कार BSNLEU महाराष्ट्र व मुंबई जिल्हा यांच्या वतीने संयुक्तिक रित्या करण्यात आला. तसेच WWCC वतीने कॉम माधुरी पाटील व टीम ने सुध्दा श्रीमती पंकजाम नम्बोदरी यांचे औक्षण करून महाराष्ट्र च्या परंपरेने त्यांना साडी-चोळी प्रदान करण्यात आली.

 हया कार्यक्रमाला जिल्हा सचिव CNTX व त्यांची टीम यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन उभयतांचे स्वागत केले. कॉम यशवंत केकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सत्काराला उत्तर देतांना कॉम नम्बोदरी यांनी संघटित संघर्ष चे महत्त्व पटवून दिले व केलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रम कॉम युसुफजी हुसेन यांचा अध्यक्षतेखाली झाला व त्यांनी कॉम नम्बोदरी यांच्या बद्दल चे आपले अनुभव कथन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिमंडळ सचिव यांनी मुंबई जिल्ह्याचे कौतुक केले