ब्रिटनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा ३० वर्षांतील सर्वात मोठा संप पाहायला मिळत आहे. ब्रिटनमधील महागाई 10 टक्क्यांवर पोहोचली असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी केली आहे. संपाचा पहिला टप्पा 21 जून 2022 रोजी झाला. पुन्हा 23 आणि 25 जून 2022 रोजी रेल्वे कर्मचारी संपावर गेले. या व्यतिरिक्त, वेगळ्या संपामुळे लंडन अंडर-ग्राउंड मेट्रो देखील बंद करण्यात आली. . या संपामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. ब्रिटनच्या रेल्वे युनियनने म्हटले आहे की, अभूतपूर्व महागाईमुळे शिक्षक, वैद्यक, कचरा विल्हेवाट करणारे कर्मचारी आणि अगदी बॅरिस्टर यांसारखे कर्मचारी वर्ग औद्योगिक आंदोलन कार्यक्रमात सहभागी होतील.
[स्रोत: टाइम्स ऑफ इंडिया दिनांक 22.06.2022] पी.अभिमन्यू, जीएस.