महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ - BSNL कर्मचारी यांना मिळणारे फायदे व सद्यस्थिती बद्दल माहिती.

09-02-23
1 Min Read
By BSNLEU MH
221
6A66676A-4782-4237-9460-96FFF62FAD02

 

कॉम्रेड वरील विषयावर काल निदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री कैलाश मोरे, उप महाप्रबंधक (प्रशासन), श्री गुलाब हसन, वेलफेर अधिकारी, कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव व कॉम यशवंत केकरे, जिल्हा सचिव यांनी खालील शासकीय अधिकारी यांची भेट घेतली व खालील मुद्दावर सखोल चर्चा केली.

महेंद्र तायडे ,                         सहाय्यक कल्याण आयुक्त (निधी शाखा) व उप कल्याण आयुक्त अतिरिक्त कार्यभार


प्रमोद चौधरी 
सहाय्यक कल्याण आयुक्त (संगणक) 

मनीषा कुंभार
संगणक चालक

मुद्दे:

1. वेलफेर बोर्ड च्या सुविधा उपलब्ध करणे: सध्या BSNL केलेल्या पेयमेंट चे डिटेल्स उपलब्ध करून देणे. एम्प्लॉईज व इम्प्लॉयेर शेअर यांचा मेळ बसवणे. LIN क्रमांक कार्यरत करून लवकरच सेवा उपलब्ध होतील.

2. पुन्हा एक मीटिंग: हे कार्य पूर्ण करण्यास वेलफेर अधिकारी, लेखा अधिकारी दावा व लेखा अधिकारी CSC हे श्रीमती मनीषा मॅडम यांचा शी चर्चा करून पोर्टल द्वारा पेटमेंट करण्यासाठी प्रयत्न करतील. 

3. कार्यशाळा: वेलफेर बोर्ड तर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा साठी Circle ऑफिस मध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 

साधारण 31 मार्च पर्यंत सर्व समस्या वर मात करून सेवा पुर्ववत होतील असा अंदाज सर्वानी व्यक्त केला. कारण VRS 19 नंतर डेटा update नसल्याने हे सर्व घडत आहे. हया प्रश्नांवर कॉम सालोडे, अमरावती हे सतत पाठपुरावा करत होते त्यांना विशेष धन्यवाद. ही बैठक व्हावी व समस्यावर तोडगा निघावा ह्यासाठी श्री कैलाश मोरे DGM Admin व कॉम यशवंत केकरे व श्रीमती मनीषा मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल BSNL एम्प्लॉईज महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने त्याचे आभार व्यक्त करतो. सोबत पुस्तिका आपल्या विशेष माहिती साठी जोडली आहे. तरी सर्व कर्मचारी वर्गाने येत्या काळात शासनाच्या हया सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती