BSNLEU ने CMD BSNL यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, थेट भरती झालेल्या कर्मचार्यांना NEPP अंतर्गत अनुक्रमे 4 वर्षे आणि 7 वर्षे पूर्ण झाल्यावर, दूरसंचार विभागातील कर्मचार्यांच्या बरोबरीने 1ली आणि 2री पदोन्नती मिळावी. ही मागणी निकाली काढण्याऐवजी कॉर्पोरेट ऑफिसने बीएसएनएलईयूला पत्र लिहून एनईपीपीचे कलम ३.२ काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे असे कलम आहे ज्यानुसार दूरसंचार विभागातून आत्मसात(absorbed) , केलेल्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 4 वर्षे आणि 7 वर्षे पूर्ण झाल्यावर 1ले आणि 2रे अपग्रेडेशन मिळतात. व्यवस्थापनाचा युक्तिवाद असा आहे की, दूरसंचार विभागामध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्यांना NEPP अंतर्गत त्यांचे 1ले आणि 2रे अपग्रेडेशन आधीच मिळाले आहे आणि NEPP च्या कलम 3.2 सोबत पुढे जाण्याची गरज नाही. व्यवस्थापनाचा हा प्रस्ताव म्हणजे खऱ्या मागणीची थट्टा करण्याशिवाय काहीच नाही. अधिकारीना अनुक्रमे 4/6 वर्षे आणि 5 वर्षे पूर्ण झाल्यावर, EPP अंतर्गत त्यांची 1ली आणि 2री पदोन्नती मिळत आहे. जर नॉन-एक्झिक्युटिव्ह्सने एक्झिक्युटिव्हजच्या बरोबरीने पदोन्नतीची मागणी केली, तर व्यवस्थापन 4/6 वर्षे आणि 5 वर्षे पूर्ण झाल्यावर एक्झिक्युटिव्हना 1ली आणि 2री अपग्रेडेशन देणारी EPP ची कलमे काढून टाकेल का? व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला बीएसएनएलईयूने कडाडून विरोध केला आहे. BSNLEU ने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे की, थेट भरती केलेल्या कर्मचार्यांना अनुक्रमे 4 वर्षे आणि 7 वर्षे पूर्ण झाल्यावर 1ले आणि 2रे अपग्रेडेशन मिळाले पाहिजे.
*-पी.अभिमन्यू, जीएस.*