सांगली जिल्हा अधिवेशन

27-02-23
1 Min Read
By BSNLEU MH
130
1

आज दिनांक 26.02.2023 रोजी सांगली BSNLEU जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले. कॉम संकपाळ यांची अध्यक्ष, कॉम विकास चव्हाण यांची जिल्हा सचिव तर कॉम लोंढे यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाली. तसेच AIBDPA चे प्रथम अधिवेशन सुद्धा हया अधिवेशन सोबत संपन्न झाले.

हया कार्यक्रमाला परिमंडळ सचिव कॉम गणेश हिंगे, BSNLEU, कॉम एम आय जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF, कॉम भालचंद्र माने, सहायक परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम सिद्धार्थ घोडेस्वार, DS SEWA, DS AIGETOA, कॉम खडके, कॉम मिलिंद पळसुले, कॉम नेताजी, कॉम कुलकर्णी व इतर वरिष्ठ कॉम्रेड आवर्जून उपस्थित होते.

कॉम हिंगे, कॉम जकाती, कॉम   हुसेन, कॉम माने यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. सर्वानी BSNLEU व AIBDPA संघटना मजबूत करण्याची ग्वाही दिली.

कामगार एकजुटीचा विजय असो.