सतर्क रहा - स्वतः ची दिशाभूल होऊ देऊ नका !

25-07-22
1 Min Read
By BSNLEU MH
251
सतर्क रहा - स्वतः ची दिशाभूल होऊ देऊ नका ! Image

 

कॉम्रेड,

9 व्या मेम्बरशीप व्हेरिफिकेशन घोषणा झाली आहे. येत्या 12 ऑक्टोबर 2022 रोजी मान्यता प्राप्त संघटना ठरविण्यासाठी आपण सर्वजण मतदान करणार आहोत. परंतु गेल्या 15 दिवसापासून आपल्या झुंजारू संघटनेचा नावाने चुकीचे व तथ्यहीन मेसेज व्हाट्सअप्प ग्रुपच्या साह्याने काही विघातक-विघ्नसंतोषी मंडळी पसरवत आहे. काही ठिकाणी आपले महासचिव कॉम्रेड पी. अभिमन्यू यांच्या प्रतिमेला हानिकारक व तुच्छ लेखणारे  मेसेज सर्व सामान्य कर्मचारी यांना पाठवून BSNL कर्मचारी यांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र काही लेटर हेड युनियन व दुष्ट प्रवृत्ती करत आहेत.

गेली अनेक वर्षे झोपून राहिलेली मंडळी एकदम जागरूक होऊन मतदान च्या आधी हातपाय मारण्याचे काम करू लागतात. जेव्हा संघटित संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा  लपून बसतात व अवसान घातकी भूमिका घेऊन कर्मचारी वर्गाचा पाठीत खंजीर खुपस्तात. कारण ते मैदानावर येऊन कामगार प्रश्नांवर आमच्याशी लढू शकत नाहीत. कधी कधी ही मंडळी मानजमेंट शी हातमिळवणी करून संघर्ष करणाऱ्या कामगार वर्गाचे अस्तित्व संपविण्याचा कट रचतात. हीच मंडळी आता तुम्हाला पुढील 2 ते 3 महिने नाना प्रकारे तुमची दिशा भूल करण्याचा प्रयत्न करतील व पुन्हां जाऊन आपल्या बिळात लपतील.

BSNL एम्प्लॉईज युनियन चे नाव आज ट्रेड युनियन क्षेत्रात मोठया अभिमानाने घेतले जाते व जिच्या कडे संपुर्ण BSNL कंपनी व तिच्या कर्मचारी वर्ग यांचे लक्ष लागून असते. 2002 ते 2019 हया 18 वर्षांच्या कालावधीत BSNL मध्ये 8 वेळा व्हेरिफिकेशन झाले त्यात आपण तब्बल 7 वेळा मोठया मताधिक्याने विजय झालो आणि असा भीम पराक्रम करणारी ही एकमेव संघटना आहे. हे फक्त शक्य झाले आहे ते आपले सर्वोच्च व निष्कलंक नेते कॉम वी ए एन नमबुदरीजी, कॉम पी अभिमन्यू यांचा सततच्या कामगार विमुख धोरणामुळे आणि आपल्या विश्वासामुळे व आपल्या सतत च्या संघर्षा मुळेच. कंपनी चा प्रश्न असो, कर्मचारी  पोलिसी चा प्रश्न असो, महिला कर्मचारी यांचे प्रश्न किंवा त्यांचे होणारे शोषण याचा विषय असो, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांचे प्रश्न असो BSNLEU ही नेहमीच संघर्षसाठी अग्रेसर राहिली आहे. म्हणून आम्हाला संपूर्ण खात्री आहे की हया वेळी सुद्धा BSNLEU मोठया मताधिक्याने निवडून येईल.  

तरी आपणांस विनंती आहे की  कोणत्याही अप्रचार ला आपल्या सारख्या सुज्ञ कर्मचारी यांनी बळी पडू नये. जर मनात काही शंका उपस्थित होत असतील तर संबंधित BSNLEU जिल्हा सचिव किंवा इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. जर त्यातूनही आपण समाधान होत नसेल तर आपण आमच्याशी सुद्धा संपर्क साधून शंकेचे निरसन करू शकतात .

 आपल्या BSNL व BSNL कर्मचारी यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी BSNLEU युनियन ला मजबूत करा.

आपले विनम्र 

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC