*महासचिव यांनी संचालक (एचआर) सोबत बैठक घेतली.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*महासचिव यांनी संचालक (एचआर) सोबत बैठक घेतली.* Image

*महासचिव यांनी संचालक (एचआर) सोबत बैठक घेतली.*

 कॉम.  पी.अभिमन्यू, जीएस यांनी आज श्री अरविंद वडनेरकर, संचालक (एचआर) यांची भेट घेतली आणि पुढील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली.

 *(१) **पे रिविजन** मागच्या नॅशनल कौन्सिलच्या बैठकीतच, कर्मचारी पक्षाने नॉन एक्सएकटिव्ह  कर्मचारी यांच्या आधीच स्वीकृत वेतनश्रेणी कमी करण्याच्या व्यवस्थापनाच्या बाजूने केलेल्या प्रयत्नांचा तीव्र निषेध केला होता.  आजच्या बैठकीत, सरचिटणीसांनी संचालक (एचआर) यांना पुन्हा एकदा विनंती केली की, व्यवस्थापन पक्ष वेतनश्रेणीच्या संदर्भात आधीच झालेल्या सहमतीचा आदर केला पाहिजे.  पुढे, त्यांनी विनंती केली की, वेतन वाटाघाटी पुन्हा एकदा सुरू व्हाव्यात आणि लवकरात लवकर करारावर स्वाक्षरी करावी, जेणेकरून ते दूरसंचार विभागाच्या मान्यतेसाठी पाठवता येईल.

 *(२) **टीटी विभागीय ऑनलाइन आयोजित परीक्षा.  **

 TT LICE 27-08-2023 रोजी आयोजित केली गेली व  परीक्षा ऑनलाइन घेतली गेली.  अनेक उमेदवारांनी असे मत नोंदवले आहे की, TT LICE ऑनलाइन ठेवल्याने त्यांच्यासाठी समस्या निर्माण झाल्या आहेत, कारण ते संगणक ऑपरेशन्सशी परिचित नाहीत.  आजच्या बैठकीत, सरचिटणीसांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद केला की, व्यवस्थापनाने TT LICE ऑनलाइन परीक्षा म्हणून घेण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन केले पाहिजे.

 *(3)* *BSNLEU च्या गाझीपूर जिल्हा सचिवाचा छळ.*

 उत्तर प्रदेश (पूर्व) परीमंडळातील गाझीपूर OA वाराणसी BA अंतर्गत येते.  तथापि, गोरखपूरच्या जीएमने बीएसएनएलईयूचे गाझीपूर जिल्हा सचिव कॉ. राकेश मौर्य यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.  हे GM, गोरखपूर यांच्या अधिकारक्षेत्राचे स्पष्ट उल्लंघन आहे.  BSNLEU च्या CHQ ने आधीच या विषयावर संचालक (HR) यांना तपशीलवार पत्र लिहिले आहे.  आजच्या बैठकीत, सरचिटणीसांनी आग्रह धरला की, संचालक (एचआर) यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे आणि जीएम गोरखपूर यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश रद्द केले पाहिजेत.

 *(4)* *बदल्यांपासून मुक्तता (इंमुनींटी - जिल्हा सचिव, BSNLEU, वडोदरा यांचे प्रकरण.*

आजच्या बैठकीत, सरचिटणीसांनी पुन्हा एकदा मागणी केली की, यापूर्वीच जिल्हा सचिव, बीएसएनएलईयू, वडोदरा यांना जारी करण्यात आलेला बदली आदेश रद्द करण्यात यावा, कारण तो मान्यताप्राप्त युनियन्सना देण्यात आलेल्या बदल्यांपासून इम्युनिटीवरील कॉर्पोरेट कार्यालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणारा आहे.  .

 *(5)* *पंजाब सर्कलमध्ये JTO LICE निकाल जाहीर न करणे.* माननीय CAT, चंदीगडमध्ये प्रलंबित असलेले प्रकरण लवकर निकाली काढण्याच्या गरजेवर सरचिटणीसांनी पुन्हा एकदा भर दिला.

 *संचालक (एचआर) यांनी सर्व समस्यांचे विश्लेषण ऐकून घेतले आणि आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.*

 *-पी.अभिमन्यू, जीएस.*