*जिल्हा अधिवेशन - महाराष्ट्र CN TX वेस्ट झोन.*
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230426-WA0108

कॉम्रेड,

आज दिनांक 26.04.2023 रोजी WTR व WTP यांचे CN TX वेस्ट झोन म्हणून एकत्रीकरण करून जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. कॉम प्रदीप बेटकर, अध्यक्ष , कॉम राजेश श्रीवास्तव, सचिव व कॉम प्रदीप डंगर, खजिनदार म्हणून अनुक्रमे एकमताने सर्व 19 जिल्हा कार्यकारणी सदस्य यांची निवड करण्यात आली.

ह्या जिल्हा अधिवेशनात श्री प्रशांत पाटील, मुख्य महाप्रबंधक हे मुख्य अतिथी म्हणून व कॉम राजू पोवळकर, अध्यक्ष म्हणून लाभले. प्रमुख वक्ते म्हणून कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम युसूफ हुसेन, GS CCWF, कॉम सुनील नागणे, परिमंडळ उपाध्यक्ष, कॉम यशवंत केकरे, DS Circle Office, कॉम सुचिता पाटणकर, संयोजक WWCC हे कार्यक्रमास लाभले. तसेच कॉम रवी बाविस्कर, DS AIBDPA कॉम मिलिंद इंगळे, ACS NFTE, कॉम भोगे, DS SNEA, कॉम प्रतेश शिंदे, DS SEWA व कॉम परमार, DS AIGETOA यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. प्रशासन च्या वतीने श्री टाकलीकर, GM,  श्री रोकडे GM, श्री अशोक कटकधोंड, DGM Admn व श्री जॉन सेलडो, DGM फायनान्स यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.  *मुख्य म्हणजे कॉम मोहन बोधावडे, माजी NFTE जिल्हा सचिव WTR व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते यांनी BSNLEU मध्ये जाहीर प्रवेश केला. कॉम प्रदीप बेटकर जे 30.04.2023 ला सेवानिवृत्त होत आहे त्यांचा सुद्धा महाराष्ट्र परिमंडळ कडून यथोचित* *सत्कार करण्यात आला.*

BSNLEU चे धडाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय कॉम अरविद लोखंडे, पुणे ज्यांचे अचानक हार्ट अटॅक ने फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते त्यांचे नाव आज सभागृहाला देण्यात आले व 2 मिनिटे मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आजचा  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम राजेश श्रीवास्तव, कॉम मुरुडकर, कॉम डंगर, कॉम प्राजक्ता तेजम, कॉम मयेकर, कॉम कसबे, कॉम गावडे, कॉम मुनीर, कॉम सोवेद, कॉम सरफराज  व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नाशिक, पुणे, पेण व इतर ठिकाणी हुन कॉम्रेड यांनी सहभाग नोंदविला. विशेष करून कॉम अजय वामोरकर यांनी प्रकृती ठीक नसतांना सुद्धा ह्या कार्यक्रमात आवर्जून सहभाग घेतला. हया कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कॉम प्रदीप बेटकर यांनी केले. शेवटी कामगार एकजुटीचा घोषणा देत जिल्हा अधिवेशनाची सांगता झाली.

BSNL जिंदाबादकामगार एकता जिंदाबादBSNLEU जिंदाबाद