*भोपाळ येथे पार पडलेल्या CEC बैठकीचे इतिवृत्त :*

09-05-23
1 Min Read
By BSNLEU MH
120
*भोपाळ येथे पार पडलेल्या CEC बैठकीचे इतिवृत्त :* Image

दिनांक 6 व 7 मे 2023 ला भोपाळ येथे झालेल्या बैठकीत कॉम नागेशकुमार नलावडेजी, कॉम जॉन वर्गीस जी व कॉम गणेश हिंगे यांनी महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने सहभाग घेतला. कॉविड 19 नंतर ही पेहली physical मीटिंग होती.

कॉम नागेशकुमार नलावडे  यांनी CHQ च्या कामाची प्रशंसा केली. तसेच गायब झालेल्या कर्मचारी यांच्या परिवार बद्दल योग्य ते आदेश BSNL कॉर्पोरेट ने दयावे ही समस्या त्यांनी मांडली. तसेच किसान आंदोलन साठी आर्थिक मदत किंवा डोनेशन ची रक्कम स्वीकारण्यासाठी  Google Pay/Pay TM सारख्या ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा हे म्हणणे मांडले.

कॉम जॉन वर्गीस यांनी राष्ट्रीय मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. सध्याची राजकीय परिस्थिती व त्याचा BSNL च्या महत्वपुर्ण योजना वर कसा प्रतिकुल परिणाम होतो याचे विवेचन केले. 4G व 5G सुरू होण्यास 15 महिने लागणार. हया काळात गेलेले कस्टमर परत येणार का हा ज्वलंत मुद्दा मांडला. सामजिक क्षेत्रात भारत किती मागे पडला आहे व आर्थिक विषमता मुळे देशात कशी नकारात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी कामगार-मजदूर-किसान यांची भक्कम एकजूट असणे कसे गरजेचे आहे ह्या वर सविस्तर भाष्य केले.

कॉम गणेश हिंगे यांनी स्टेग्नाशन, नवीन प्रोमोशन पोलिसी, बँक खाते उघडण्यासाठी PAN क्रमांक, IDA थकबाकी, 3rd PRC साठी AUAB चे चलो दिल्ली हे स्थगित असलेले आंदोलन पुन्हा सुरू करणे ह्या बाबतीत CHQ चे लक्ष वेधले. तसेच CCWF, WWCC व AIBDPA चे कार्य समाधान पूर्वक सुरू आहे व चांगल्या प्रकारे समनव्य साधला जात आहे. वेळे अभावी खालील मुद्द्यावर सविस्तर पत्र CHQ ला देण्यात येईल. तसेच SC/ST मुद्दा व अनेक ज्वलनशील मुद्दे CCM मध्ये आहेत. ह्यावर जर CCM मध्ये निर्णय झाला नाही तर आंदोलनचा मार्ग स्वीकारला जाईल. त्यासाठी CHQ ने संपूर्ण पाठींबा दयावा ही विनंती केली.

1. New Computers

2. Replacement of old baatery set.

3. Change in CROP policy

4. Conversion from copper to fiber, if necessary.

5. Poor MTNL network6. No second Saturday in field unit

7. To increase security deposit of FTTH vendor

8. To act on letter dated 17.4.23 reg EPF to GPF.

9. No compulsion of emergency certificate, if medical treatment is taken in non empanelled hospitals.

शेवटी ह्या बैठकीचे समारोप भाषण करतांना कॉम पी अभिमन्यू यांनी  सर्व मुद्द्यावर आपले मत सविस्तरपणे मांडले. काही जिल्ह्यात आंदोलनचे कार्यक्रम होत नाही त्याबद्दल त्यानी नाराजगी व्यक्त केली. TT च्या ऑनलाईन exam ऑफलाइन घेण्याबद्दल त्यांनी BSNL mangement ला लिहले आहे. तसेच ह्या आठवड्यात डायरेक्टर HR यांचा सोबत होणाऱ्या official बैठकीत अनेक महत्वपुर्ण HR मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.

 *सध्या अपेक्षित कर्मचारी वर्ग आंदोलनात उतरत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. जर CHQ ला मजबूत* *ठेवण्यासाठी व अन्याय्य विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक जिल्हा पुढे आला पाहिजे अशी माफक अपेक्षा त्यांनी मांडली.* *येणाऱ्या काळात प्रत्येक परिमंडळ ने ट्रेड युनियन क्लास घ्यावा असा त्यांनी आग्रह केला. येणाऱ्या* *काळात महाराष्ट्र परिमंडळ अशा स्वरूपाचा ट्रेड युनियन क्लास वरिष्ठ कॉम्रेड यांच्या सल्ला ने घेईल. हया* *बैठकीत संघटित संघर्ष शिवाय पर्याय नाही हे अधोरेखित झाले.*

म्हणून सर्व जिल्हा सचिव, CWC सद्स्य व युनियन प्रतिनिधी यांना विनंती आहे की त्यांनी आक्रमकपणे सर्व आंदोलन कार्यक्रम पार पाडावे जेणेकरून BSNLEU फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही तर वेळ आल्यास मैदानात उतरुन लढाई करण्यास सिद्ध आहे हे दिसले पाहिजे.

ही बैठक यशस्वी करण्यासाठी कॉम प्रकाश शर्मा, AGS कॉम रंगवंशी, CS, कॉम मनोज शर्मा ACS, कॉम वर्मा, कॉम शाहरुख व MP BSNLEU टीम ने विशेष मेहनत घेतली. हया टीम ला महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने लाल सलाम.

BSNL जिंदाबाद

BSNLEU जिंदाबाद

कामगार एकता जिंदाबाद