*नांदेड जिल्हा अधिवेशन*

15-09-23
1 Min Read
By BSNLEU MH
145
*नांदेड जिल्हा अधिवेशन*    Image

*नांदेड जिल्हा अधिवेशन*  

कॉम्रेड आज BSNLEU नांदेड जिल्ह्याचे 8 वे अधिवेशन कॉम  लालू कोंडालवडे जी यांचा अध्यक्षतेखाली उत्स्फूर्तपणे पार पडले. परिमंडळच्या वतीने कॉम गणेश हिंगे, CS व कॉम युसूफ हुसेन, AGS CCWF हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथीच्या रुपात श्री अनिलकुमार जी महाप्रबंधक नांदेड व वरिष्ठ BSNL अधिकारी उपस्थित होते. GM साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात BSNLEU ला संपूर्ण सहकार्य करू व स्टाफ समस्याला प्राधान्य देऊ असे अभिवचन दिले. लातूर OA च्या वतीने कॉम प्रकाश खंडागळे, DP व कॉम सुनीता सन्मुखराव, DS,कॉम प्रकाश जैन, माजी परिमंडळ कार्यकारणी सद्स्य, व इतर सहकारी उपस्थित होते. तसेच परभणी OA च्या वतीने कॉम सूर्यभान सूर्यवंशी, DS AIBDPA, कॉम चाटे, DP BSNLEU, कॉम अर्जून क्षीरसागर, DS, कॉम बेग, माजी परिमंडळ कार्यकारणी सद्स्य व सहकारी यांनी हजेरी लावली. नांदेड मधून ही वरिष्ठ कॉम कोकरे जी, माजी DS, कॉम देविदास फुलारी माजी LCM सचिव व सुपरिचित साहित्यिक, कॉम शाम जाधव, कॉम रायलवाड, अध्यक्ष AIBDPA, माजी कार्यकारणी सद्स्य व AIBDPA कार्यकारणी सद्स्य,  कॉम कुटूंरकर, माजी जिल्हा अध्यक्ष, कॉम वानखेडे, सचिव AIBDPA, WWCC च्या संयोजक कॉम अर्चना तोटेवाड  आणि काँट्रॅक्ट वर्करस युनियन चे कॉम शेख जीलानी व कॉम अब्दुल रहीम यांनी आवर्जून हजेरी लावली. दुपार पर्यंत उद्घाटन सत्र चालू होते. त्यानंतर सर्वानी एकत्र बसून सहभोजन घेतले.  दुपारच्या सत्र नंतर जिल्हा सचिव कॉम रवी कंधारकर यांनी आपला कार्यअहवाल मांडला त्याला सर्वानी मान्यता दिली. त्यानंतर कॉम सुरेश श्रीवास्तव, खजिनदार यांनी आपला आर्थिक ताळेबंद मांडला. ह्या जमा-खर्च ला सर्वानी स्वीकृती दिली. ह्या नंतर परिमंडळ सचिव कॉम हिंगे यांनी परिमंडळ व CHQ पातळीवर जी कामे झाली त्यावर सभागृहाला माहिती दिली. कॉम युसूफ हुसेन यांनी कॉन्ट्रॅक्ट वर्कर च्या सचिव रुपात कॉन्ट्रॅक्ट लेबर च्या ऍक्टिव्हिटी बद्दल सभागृहात हजर असलेल्या लेबर व कामगार वर्गाला माहिती दिली.  तसेच त्यांनी नवीन लेबर युनियनची कार्यकारणी स्थापित केली.   कार्यक्रमच्या शेवटी एकमताने नवीन जिल्हा कार्यकारणी ची घोषणा परिमंडळ च्या वतीने करण्यात आली. कॉम रवी कंधारकर, जिल्हा अध्यक्ष, कॉम लालू कोंडालवडे, जिल्हा सचिव व कॉम सुरेश श्रीवास्तव  यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. सहायक जिल्हा सचिव यांची दोन पदे लातूर व परभणीसाठी  राखीव ठेवण्यात आली आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉम कोंडालवडे, कॉम कंधारकर, कॉम बलवंतकर, कॉम श्रीवास्तव, कॉम भांडगे, कॉम कांबळे, कॉम केंद्रे, कॉम कुळकर्णी व इतर श्रीमती हटकर, श्रीमती निठोरे व इतर महिला कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन म्हणून कॉम कुंटुरकर यांनी आपली भूमिका उत्तम बजावली. परिमंडळ च्या वतीने नुतन कार्यकारणी चे अभिनंदन करण्यात आले व संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रम नंतर कॉम इंगोले, जिल्हा सचिव AIGETOA व नांदेड co operative सोसायटी चे अध्यक्ष यांनी कॉम गणेश हिंगे, कॉम युसूफ हुसेन व कॉम लालू कोंडालवडे यांचा सोसायटी च्या वतीने विशेष सत्कार केला.

जय BSNL, जय BSNLEU कामगार एकता जिंदाबाद