*उत्तराखंड बोगद्याच्या संकटामागे नफ्यासाठी अमर्याद भुक असलेले धोरणे कारणीभूत आहेत - कामगार संघटनांचा आरोप.*
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात कोसळलेल्या बोगद्यात ४१ कामगार अडकले आहेत. 12 नोव्हेंबर 2023 पासून कामगार बोगद्यात अडकले आहेत. भारताच्या 10 सेंट्रल ट्रेड युनियन्सनी असा आरोप केला आहे की, सुरक्षेच्या नियमांचे संपूर्ण उल्लंघन हे अपघाताचे कारण आहे. त्यांनी आरोप केला आहे की, लांब बोगदे बांधताना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्तीचे असलेले एस्केप मार्ग/बोगदे यांचेही नियोजन नव्हते. संयुक्त निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, सरकारने तात्काळ आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या आरोग्य आणि सुरक्षितता करारांना मान्यता द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी. केंद्रीय कामगार संघटनांनी आरोप केला आहे की, केंद्राने बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी खूप उशिरा एक टीम पाठवली होती. एका वेगळ्या निवेदनात कन्स्ट्रक्शन वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाने असा आरोप केला आहे की, हा अपघात सरकारने राबवलेल्या नफ्याच्या भुकेल्या विकास धोरणांचा परिणाम आहे. *-पी.अभिमन्यू, जीएस.*