छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारणी बैठक

19-09-23
1 Min Read
By BSNLEU MH
119
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारणी बैठक   Image

छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारणी बैठक 

कॉम्रेड  बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यकारिणीची  बैठक कॉम्रेड रामेश्वर सुरासेजी यांचा अध्यक्षतेखाली उत्स्फूर्तपणे पार पडले  तसेच विशेष अतिथीच्या रुपात परिमंडळच्या वतीने कॉम गणेश हिंगे, CS व कॉम युसूफ हुसेन, AGS CCWF हे उपस्थित होते. जालना OA च्या वतीने कॉम संजय वाखारकर जिल्हा सचिव व  DS/ACS AIBDPA कॉम गुलाबरावजी काळे, LCM सचिव कॉम विलासराव सवडे, कॉम रुक्मिणी राख जिल्हा सचिव BSNLEU,  जिल्हा कार्यकारिणी व AIBDPA सेवानिवृत्त सद्स्य व सहकारी यांनी हजेरी लावली .  परिमंडळ सचिव कॉम हिंगे यांनी परिमंडळ व CHQ पातळीवर जी कामे झाली त्यावर सभागृहाला माहिती दिली व संघटना बाबीवर चर्चा केली व अपप्रचार करणाऱ्या संघटनेचा खरपूस समाचार घेतला भाषणाच्या शेवटी थर्ड PRC वर अपप्रचार व चुकीचा गैरसमज यावर सविस्तर मार्गदर्शन केले व सत्याची बाजू त्यांनी मांडली. SNEA असोसिएशन चे जिल्हा श्री सचिव जयेश गंगाळे व जिल्हाध्यक्ष श्री हरीश साबळे तसेच श्री रमेश दुबिले यांनी परिमंडल सचिवाचे स्वागत केले त्यानंतर परिमंडल सचिवांनी SNEA व SEWA असोसिएशन चे प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन केले व आपण क्रमांक एक ची असोसिएशन काळाची गरज असल्याचं वक्तव्य परिमंडल सचिवांनी केलं. कॉम युसूफ हुसेन यांनी कॉन्ट्रॅक्ट वर्कर च्या महासचिव  रुपात कॉन्ट्रॅक्ट लेबर च्या ऍक्टिव्हिटी बद्दल सभागृहात हजर असलेल्या लेबर व कामगार वर्गाला माहिती दिली.  तसेच त्यांनी नवीन लेबर युनियनची कार्यकारणी स्थापन केली.   करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड रुक्मिणी राख जिल्हा सचिव यांनी केले व जिल्हाध्यक्ष कॉम्रेड रामेश्वर सुराशे यांनी  अध्यक्षीय भाषण व समारोप केला.

कामगार एकता जिंदाबाद