कॉम्रेड अनिल (आबा) शिवाजी पाटील, (ज्युनिअर इंजिनिअर) सहायक परिमंडळ सचिव व जिल्हा सचिव, BSNL Employees युनियन यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम BSNL कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे दिनांक 19.08.2022 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
हया कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मंचावर कॉम नागेशकुमार नलावडे, उपाध्यक्ष BSNLEU CHQ व अध्यक्ष महाराष्ट्र परिमंडळ हे होते. तसेच विशेष अतिथी म्हणून श्री नितिन महाजन, महाप्रबंधक, कॉम जॉन वर्गीस, डेप्युटी महासचिव CHQ, कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव, कॉम युसूफ हुसेन, महासचिव CCWF, कॉम घनश्याम वाघ, माजी जिल्हा सचिव, BSNLEU व कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती कॉम अनिल पाटील व सौ पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते. मंचावरील सर्व मान्यवरांनी कॉम पाटील यांचे कर्तृत्व व स्वभाव गुण यांवर स्तुतीसुमने उधळली. परिमंडळ च्या वतीने स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. तर जळगाव जिल्हाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमात सर्व प्रथम कॉम नागेशकुमार नलावडे व कॉम जॉन वर्गीस यांची CHQ च्या नेतेपदी निवड झाल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. अनेक वक्त्यांनी कॉम अनिल पाटील यांच्या विषयी आपले अनुभव कथन केले. कॉम भदाणे, DS SNEA, कॉम गोडसे, DS NFTE व अन्य संघटनेचे पदाधिकारी व सोबत BSNL चे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्र परिमंडळ BSNLEU, कॉम निलेश काळे व कॉम शालीक पाटील जळगाव BSNLEU व नाशिक BSNL एम्प्लॉईस सोसायटी तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
हया कार्यक्रमासाठी कॉम अनिल पाटील यांच्या कुटुंबातील सद्स्य यांनी सुद्धा विशेष कष्ट घेतले. संपूर्ण कुटुंबाने आपल्या भावना एका सुंदर चित्रफिती द्वारे व्यक्त केल्या. ते क्षण सभागृहातील प्रत्येक व्यक्ती साठी एक वैशिष्ट्यपूर्ण व भावनापूर्ण होते. ही चित्रफीत कॉम पाटील यांना व संपूर्ण सभागृहाला सुद्धा एक आगळेवेगळे सरप्राइज होते. हया कार्यक्रमात कॉम पाटील यांचा कुटुंबाविषयी असलेला अत्यंत हळवापणा दिसून आला. विशेषतः नात व नातू वर असलेले विशेष प्रेम आणि त्यांच्या बाललीला ने कसा दिवसभराचा शीण निघून जातो त्याचे अर्थपूर्ण वर्णन अत्यंत भावूक करणारे होते. त्यांच्या मातोश्री ह्या जवळपास 82 वर्षांच्या आहेत व ऑक्सिजन सिलेंडर शिवाय चालू शकत नाही त्या सुद्धा हया कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या. आपल्या मुलाचे सर्व थरातून होणारे कोड-कौतुक ऐकताना हया माता भारावून गेल्या व त्यांना खूपच अभिमान वाटला व हा सोहळा पाहण्यासाठी त्या किती आतुर होत्या हे सुद्धा प्रकर्षाने दिसून आले. एकंदरीत संपूर्ण कुटुंब व आप्तेष्ट व जवळचे नातेवाईक मंडळी हीच आपली संपत्ती आहे असेच वेळोवेळी सर्वाना जाणवले.
सौ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कॉम अनिल पाटील हे घरात असतांना त्यांचे वागणे कसे होते याचा एकएक पैलू त्यांनी उलगडले व पती म्हणून त्यांनी नेहमीच आपल्या पत्नीला त्यांनी कसा मान सन्मान दिला व त्या जॉब वर असतांना नेहमीच सहकार्यची भावना जपली. आपल्या सहचारिणी ला कोणताही त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. तसेच कुटुंबातील सर्व सदस्य यांचे छोटे-मोठे लाड नेहमीच हसतमुखाने पुरवायचे.
सत्काराला उत्तर देतांना कॉम अनिल पाटील यांनी 39 वर्षातील आपली कारकीर्द व सोबतचे सहकारी यांचा विषयी कृततन्याची भावना व्यक्त केली. आपल्यातील गुण व दोष यांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. परंतु कुटुंबातील प्रत्येक सद्स्य यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केले त्यामुळे आज एक सशक्त पिता, एक आज्ञाधारी पुत्र व एक प्रेमळ सासरा व नातवंडाचा एक हळवा आजोबा म्हणून मी कसा घडलो हे ते सांगण्यास विसरले नाही. संघटनेत काम करत असताना आपल्या स्वभावात अत्यंत चांगल्या स्वरूपाचा आमूलाग्र बदल झाला याची त्यांनी कबुली दिली. एखाद्या सद्स्य चे युनियन प्रतिनिधी म्हणून काम केल्यावर जो आनंद मिळतो हा जगातील सर्वोत्तम आनंद आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. हया पुढे ही संघटनेला नाशिक व महाराष्ट्रत मजबूत करण्यासाठी विशेष परिश्रम घेऊ अशी त्यांनी ग्वाही दिली.
हया सेवापूर्ती कार्यक्रमात श्री नितिन महाजन, प्रधान महाप्रबंधक ज्यांची अहमदाबाद येते पदोन्नती वर बदली झाली आहे. त्यांना सुद्धा BSNLEU तर्फे निरोप देण्यात आला. TWWO नाशिक यांनी सुद्धा त्यांचा विशेष सत्कार केला गेला. महाजन साहेब यांचा विषयी बोलताना प्रत्येक वक्ता भरभरून बोलला. त्यांची काम करण्याची पद्धत व सर्व कर्मचारी वर्गात मिसळून त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा त्यांचा मानस हा नेहमीच प्रत्येक कर्मचारीला भुरळ घालतो. साहेबांनी सुद्धा सत्कारला उत्तर देतांना त्यांच्या आनंदमयी जीवनाचे रहस्य सहज उलगडले व जीवनात नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला सर्वाना त्यांनी दिला. तसेच काम करताना सर्व नाशिककरानी दाखवलेल्या विशेष प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले व पुन्हां महाराष्ट्रत किंवा दिल्लीत मोठी जबाबदारी भेटल्यास पुन्हा उत्स्फूर्तपणे व नवीन जोमाने काम करण्याची जिद्द त्यांनी दाखवली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व युनियन प्रतिनिधी व मित्र परिवाराने, कुटुंबातील सद्स्य यांनी मोठी मदत केली. जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम राजेन्द्र लहाने, कॉम सुधीर देशपांडे, कॉम अरुण उगले, कॉम देवरे, कॉम शैलेश दांडे, कॉम राजीव जाधव, कॉम अजय वामोरकर,महिला आघाडी व सक्रिय कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. परिमंडळ च्या वतीने कॉम गणेश भोज यांनी सुंदर स्मृती चिन्ह बनवून दिले. हया कार्यक्रमाचे सुदंर व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सूत्रसंचालन कॉम एम आर शिंदे यांनी उत्कृष्टपणे केले. ह्या भव्य कार्यक्रमास जवळपास 450-500 युनियन प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आप्तेष्ट व नातेवाईक मंडळी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम नंतर सर्व उपस्थिथानी उत्तम व चविष्ट भोजनाचा आनंद घेतला. सर्वानी तृप्त होऊन आबांना व त्याच्या कुटुंबाला अनेक शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले. नाशिकमधील असा भव्य व दिव्य सोहळ्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार होतो याचा आम्हाला नेहमीच गर्व राहील.
जय BSNL, जय BSNLEU