*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक 12 व 13 ऑक्टोबरला सोलापूर येथे उत्साहात पार पडली.*

14-10-23
1 Min Read
By BSNLEU MH
180
*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक 12 व 13 ऑक्टोबरला सोलापूर येथे उत्साहात पार पडली.*   Image

*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ कार्यकारणीची बैठक 12 व 13 ऑक्टोबरला सोलापूर येथे उत्साहात पार पडली.* 

कॉम नागेशकुमार नलावडे जी यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडळ कार्यकारणी बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज व युनियन ध्वज यांचे ध्वजारोहण कॉम पी अभिमन्यु जी व कॉम नलावडे जी यांच्याकडून झाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या तसबिरी वर पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. हया बैठकीच्या उदघाटन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून कॉम पी अभिमन्यु जी, महासचिव BSNLEU व मुख्य अतिथी म्हणून कॉम नरसय्या आडम जी (मास्तर), उपाध्यक्ष CITU व माजी आमदार हे लाभले. ह्या मंचावर कॉम जॉन वर्गीस, उपमहासचिव BSNLEU, श्री श्रीकांत मब्रूखाने, उपमहाप्रबंधक, BSNL सोलापूर, कॉम मोहम्मद जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम युसुफ हुसेन, परिमंडळ सचिव MHBSNLCWU, कॉम सुचिता पाटणकर, संयोजक WWCC, कॉम आप्पासाहेब गागरे, माजी परिमंडळ अध्यक्ष व जेष्ठ नेते कॉम दत्ता अळगीकर, अध्यक्ष सोलापूर BSNLEU हे उपस्थित होते व त्यांनीही बैठकीला संबोधित केले. हया कार्यक्रमचे सूत्रसंचालन कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव यानी केले. तर  हया कार्यक्रमात उपस्थित नेते, जिल्हा सचिव, कार्यकारणी सद्स्य व सक्रिय कार्यकर्ते यांचे स्वागत कॉम अब्दुल हमीद शेख, जिल्हा सचिव, सोलापूर यांनी केले. हया कार्यक्रमात कॉम पी अभिमन्यु जी व कॉम नागेशकुमार नलावडे जी यांचा विशेष सत्कार SNEA, AIGETOA, AIBDPA, जय भीम SEWA, कॉम शिंदे व सहकारी, SDE, टेम्पररी स्टेटस मजदूर व सहकारी यांनी केला. BSNLEU चे जुने  जाणते जिल्हा सचिव कॉम ए एन खान यांचा सुद्धा विशेष सत्कार कॉम पी अभिमन्यु यांनी केला.  3 रे पे रिविजन, स्टेग्नाशन, 4G व 5G सेवा, BSNL ला मारक सरकारी नीती, बेरोजगारी, सरकारी नोकरीचे खाजगीकरण, जाती- धर्मात तेढ निर्माण करून कामगार चळवळ ला धक्का पोहचवणे, शेतमालाला हमी भाव नसणे, काँट्रॅक्ट लेबर ची पिळवणूक, देशातील मुख्य मुद्द्यावर जनसामान्यांची भावना, जागतिक गरिबी इंडेक्स मध्ये 121 स्थाना पैकी भारताचे 107 वे चिंताजनक स्थान, पॅलेस्टाईन-इस्त्राईल संघर्ष व इतर ज्वलंत समस्यावर सखोल व मौलिक मार्गदर्शन हया वक्त्यांनी दिले. हया कार्यक्रमात कॉम आडम मास्तर जी यांचे आत्मचरित्र " संघर्षाची मशाल हाती " हे उपस्थित मान्यवर यांना भेट स्वरूप देण्यात आले ह्या साठी कॉम मनोज शिंदे, परिमंडळ उपाध्यक्ष यानी विशेष परिश्रम घेतले. हया कार्यक्रमात अध्यक्ष कॉम दत्ता अळगीकर यांना महासचिव यांचा कडुन विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांनी संघटनेला दिलेल्या योगदान बद्दल सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. त्याच बरोबर परिमंडळ संघटनेला वेळोवेळी आपली सेवा देणारे कॉम दीपक म्हस्के, परभणी कॉम महेश अरकल, मुंबई व कॉम दिलीप देवकर, मुंबई यांना भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सर्वात जेष्ठ कॉम्रेड प्रकाश जैन, नांदेड यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  उदघाटन सत्र संपल्यावर जिल्हानिहाय रेपोर्टिंग हे जिल्हा सचिव व कार्यकारणी सदस्य यांच्या कडून करण्यात आले. हयात अनेक ज्वलंत मुद्दे जसे JE ट्रान्सफर, प्रलंबित मेडिकल बिले, महाराष्ट्र वेलफेअर बोर्ड च्या सुविधा, मान्यताप्राप्त हॉस्पिटल, EPF दावा निमित्त असुविधा, SC/ST कास्ट वेलीडिटी, IQ ची दुरवस्था, ऑनलाइन हजेरी मधील समस्या, टेलिकॉम सुविधा चा बोजवारा, CSC व आधार केंद्र चा अंदागोंदी कारभार, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून होणार जाच, ,केबल चोरी, कॉपर केबलची दुरवस्था, FTTH मध्ये गडबड गोंधळ अशा अनेक समस्यावर पदाधिकारी यांनी आपली मते परखडपणे मांडली. ह्या सर्व प्रश्नांवर सारांश देतांना परिमंडळ सचिव यांनी केलेल्या पत्रव्यवहार व वरिष्ठ अधिकारी यांचा सोबत झालेल्या चर्चा याचा लेखाजोखा सभागृहात मांडला. तसेच परिमंडळ प्रशासन कडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही ह्या बद्दल सभागृहाचे लक्ष वेधले. सर्व पदाधिकारी यांनी परिमंडळ प्रशासन यांचा ढिसाळ कारभारवर आपला रोष व्यक्त केला. तसेच परिमंडळला आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्यास सांगितले व तशा प्रकारचा ठराव सुद्धा सभागृहाने एकमताने संमत केला. अशाच प्रकारची तक्रार NFTE  महाराष्ट्र परिमंडळ कडून ही प्राप्त झाली असून भविष्यात जर BSNLEU ने जर काही आंदोलन कार्यक्रम हाती घेतल्यास त्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन परिमंडळ सचिव NFTE यांनी सुद्धा दिले आहे असे नमूद करण्यात आले. नंतर सोलापूर स्वागत समितीने सर्वाना धन्यवाद दिले आणि दिलेल्या सहकार्य बद्दल आभार व्यक्त केले. हया कार्यक्रम मुळे  अनेक सक्रिय कार्यकर्ते घडण्यासाठी निश्चित मदत मिळेल असा विश्वासही परिमंडळला  वाटतो. राष्ट्रगीताने हया चर्चा सत्राची यशस्वी सांगता झाली.   भोजन अवकाश नंतर दुपारी 3 वाजता WWCC ची विशेष बैठक सुरू झाली हयात इतर जिल्हातून आलेल्या संयोजक WWCC व सक्रिय महिला कॉम्रेड यांनी सहभाग नोंदवला व चर्चेत भाग घेतला. कार्यरत महिला कर्मचारी यांचा अडचणी व इतर समस्या व कार्यलयात मिळणारी वागणूक ह्या बद्दल महिला कॉम्रेड यांनी आपले अनुभव कथन केले.  महिला कॉम्रेड यांना त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल सर्व महिला कॉम्रेड यांनी BSNLEU CHQ यांचे आभार व्यक्त केले व भविष्यातील प्रत्येक संघर्षात आम्ही सर्व जण एकदिलाने संघटनेच्या बाजूने उभे राहू अशी ग्वाही दिली. हया बैठकीला स्वतः महासचिव कॉम अभिमन्यु जी स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी सर्व महिला कॉम्रेड यांचे मनोबल उचविण्यासाठी त्यांना अनेक स्त्री सशक्तीकरण ची उदाहरणे दिली आणि कार्यरत महिला यांची जबाबदारी व अधिकार स्पष्ट केले. ह्या कार्यक्रमात कॉम अभिमन्यु जी यांचा धर्मपत्नी कॉ के कमलादेवी यांचा सुद्धा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. WWCC ची ही बैठक यशस्वी करण्यासाठी कॉम सुचिता पाटणकर, संयोजक, कॉम अमिता नाईक, सहसंयोजक CHQ व सोलापूर महिला टीम यांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम सुरू असताना कॉम अमिता नाईक यांचा JE परीक्षेचा निकाल लागला आणि ह्या परीक्षेत त्या यशस्वी झाल्याबद्दल सर्व कॉम्रेड यांनी त्यांचे अभिनंदन केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम दत्ता अळगीकर, कॉम अब्दुल हमीद शेख, कॉम मनोज शिंदे, कॉम बिटोडकार,कॉम सय्यद, कॉम सज्जाद, कॉम मुलाणी, कॉम सिद्धराम, कॉम दाऊद, कॉम विनायक, कॉम कुमार अलगीकर, कॉम स्वप्नाली पालसे, कॉम गीता जाधव व इतर सर्व सक्रिय कार्यकर्ते यांनी संपूर्ण सहकार्य केले. हया कार्यक्रमाला जुने पदाधिकारी व AIBDPA च्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली. सोलापूर BSNL प्रशासनाकडून सुद्धा योग्य ती मदत मिळाली. सर्वांच्या सहकार्य ने हा कार्यक्रम यशस्वी झाला. उत्तम सभागृह, रुचकर भोजन, आरामदायी निवासाची सोय व योग्य मान सन्मान मुळे सर्व प्रतिनिधी भारावून गेले. परिमंडळ युनियन ने सुद्धा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे एक विशेष ट्रॉफी देऊन आभार व्यक्त केले व न्यात अज्ञात अशा सर्व कार्यकर्त्याना धन्यवाद दिले.  BSNL जिंदाबाद, BSNLEU जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद,  इन्कलाब जिंदाबाद