*प्रिय कॉम्रेड,* *आपल्या सर्वांना माहिती आहेच की हमास ने 7 ऑक्टोबर पहाटे इस्त्राईल वर एक घातकी हल्ला केला त्यात शेकडो निरपराध नागरिक मारले गेले व हजारो नागरिक जखमी झाले. ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनतर जवाबी कारवाईत असंख्य निरपराध पॅलेस्टाईन नागरिक सुद्धा मारले गेले. हया सैन्य कारवाई चा सुद्धा आम्ही निषेध करतो.*

16-10-23
1 Min Read
By BSNLEU MH
138
IMG-20231016-WA0049

*प्रिय कॉम्रेड,*  
  *आपल्या सर्वांना माहिती आहेच की हमास ने 7 ऑक्टोबर पहाटे इस्त्राईल वर एक घातकी हल्ला केला त्यात शेकडो निरपराध नागरिक मारले गेले व हजारो नागरिक जखमी झाले. ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनतर जवाबी कारवाईत असंख्य निरपराध पॅलेस्टाईन नागरिक सुद्धा मारले गेले. हया सैन्य कारवाई चा सुद्धा आम्ही निषेध करतो.*  *ह्या रक्तरंजीत संघर्ष फार जुना आहे. त्यात जर चर्चा केली तर ती कधी संपणार नाही. आता इस्त्राईल ने गाझा पट्टीतील 20 लाख पेक्षा अधिक नागरिक यांचा पाणी, वीज व अन्न पुरवठा खंडित केला आहे व सतत हवाई हल्ले करीत आहेत. परंतु यात दहशतवादी कमी पण निरपराध पॅलेस्टाईन नागरिक मोठया प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत ज्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. याचा युनायटेड नॅशन ने सुद्धा निषेध केला असून लवकरात लवकर संघर्ष थांबविण्यासाठी दोन्ही पक्षाना आवाहन केले आहे. ह्या संघर्षामुळे 3 रे महायुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत.*  *ह्या बाबतीत वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन ने एक अपील जारी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केले आहे. हया निमित्ताने 18.10.2023 ( बुधवारी ) सभा घेण्यासाठी सांगितले आहे. आपण WFTU चे घटक असल्याने ह्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य करायचे आहे. सर्व जिल्हा सचिव व CWC सद्स्य यांनी भोजन अवकाश वेळी हा कार्यक्रम करायचा आहे. सोबत काही माहिती व विडिओ आपणांस पूर्वतयारी निमित्त पाठविण्यात येत आहेत.*