BSNL च्या नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी नवीन प्रमोशन पॉलिसी त्वरीत अंमलात आणा - BSNLEU ने CMD BSNL ला सांगितले.

23-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
682
BSNL च्या नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी नवीन प्रमोशन पॉलिसी त्वरीत अंमलात आणा - BSNLEU ने CMD BSNL ला सांगितले. Image

BSNLEU ने आधीच CMD BSNL यांना 09.05.2022 रोजी पत्र लिहून गैर-कार्यकारींसाठी (नॉन एक्सएकटिव्ह) नवीन पदोन्नती धोरण लागू करण्याची मागणी केली आहे.  कॉ.पी.अभिमन्यू, जीएस आणि कॉ. जॉन वर्गीस, डी.जी.एस, यांनी श्री पी.के.पुरवार यांची भेट घेतली.  BSNLEU ने CMD  BSNL ना नवीन प्रमोशन पॉलिसीची मागणी का करत आहे हे आज स्पष्ट केले.  त्यांनी सांगितले की, एक्झिक्युटिव्ह आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह यांच्यातील असमानता, तसेच दूरसंचार विभागातून आत्मसात(absorbed) केलेले कर्मचारी आणि थेट भरती केलेले कर्मचारी यांच्यातील असमानता दूर केली पाहिजे.  पदोन्नतीचे काम रखडल्यामुळे गैर-कार्यकारी कर्मचाऱ्यांना होणारा त्रासही नवीन पदोन्नती धोरणाच्या अंमलबजावणीद्वारे दूर व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

पी.अभिमन्यू, जीएस.