*BSNL मधील कार्यरत महिला कर्मचारी यांचा समनव्य समितीचे 3 रे अखिल भारतीय संमेलन मुंबईत पार पडले.*

31-03-26
1 Min Read
By BSNLEU MH
3
*BSNL मधील कार्यरत महिला कर्मचारी यांचा समनव्य समितीचे 3 रे अखिल भारतीय संमेलन मुंबईत पार पडले.* Image

*BSNL मधील कार्यरत महिला कर्मचारी यांचा समनव्य समितीचे 3 रे अखिल भारतीय संमेलन मुंबईत पार पडले.*

दिनांक 28 मार्च रोजी मुंबई मधील आंध्र महासभा व जिमखाना, दादर येथे BSNL कार्यरत महिला समनव्य समितीचे एक दिवसीय अखिल भारतीय अधिवेशन संपन्न झाले. हया अधिवेशनात महिला सशक्तीकरण व महिलांचे अधिकार हया विषयावर अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. ह्या कार्यक्रमाचे मुख्य उदघाटक कॉम के हेमलता, उपाध्यक्ष CITU ह्या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम के रमादेवी ह्या होत्या. CITU महाराष्ट्र चे महासचिव कॉम एम एच शेख यांनी प्रखर भूमिका मांडली. BSNL एम्प्लॉईस युनियन चे वरिष्ठ नेते अध्यक्ष कॉम्रेड एम विजयकुमार, महासचिव कॉम अनिमेश मित्रा, उपाध्यक्ष कॉम पी अभिमन्यू, महाराष्ट्र अध्यक्ष कॉम नागेशकुमार नलावडे, सहाय्यक महासचिव कॉम जॉन वर्गीस, महाराष्ट्र सचिव कॉम कौतिक बस्ते, खजिनदार कॉम इरफान पाशा, उपाध्यक्ष कॉम विठ्ठलभाई परमार यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली. स्वागतपर भाषण कॉम गणेश हिंगे, उपमहासचिव यांनी दिले.

ह्या कार्यक्रमात देशातून व महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यातून जवळपास 150 महिला डेलीगेटस यांनी सहभाग नोंदविला. हया कार्यक्रमात अनेक महिलांनी BSNL मानजमेंट व देशातील राजकीय वर्ग महिला वर्गाबाबत कसा अनास्था बाळगून आहे त्याबद्दल तीव्र नाराजी दर्शवली. जर समाज मजबूत करायचा असेल किंवा भारताला साल 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर देशातील महिला वर्गाची आर्थिक, सामाजिक व राजकीय सद्यस्थितीत बदल होणे गरजेचे आहे असे परखड मत मांडले. हया कार्यक्रमाच्या शेवटी पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली. कॉम सुलग्ना बासू यांची संयोजक तर कॉम अमिता नाईक व कॉम के रेखा यांची सहसंयोजक म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम अमिता नाईक, सहसंयोजक नवी दिल्ली, कॉम मंजुषा लचके, संयोजक महाराष्ट्र, कॉम मंदा मालमपल्ली सहसंयोजक, कॉम माधुरी सोनारे, सहसंयोजक, कॉम माधवी माने, संयोजक मुंबई व त्यांची टीम यांनी विशेष प्रयत्न केले. हा कार्यक्रम मुंबईत होत असल्याने कॉम महेश अरकल, जिल्हा सचिव BSNLEU मुंबई व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेतली व कुणालाही त्रास होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. तसेच कॉम युसूफ हुसेन, मुंबई जिल्हा अध्यक्ष BSNLEU यांनी आभार प्रदर्शन केले.

कॉम्रेड मंजुषा लचके
संयोजक, WWCC
महाराष्ट्र