कॉम रोहिदास दुधवाडकर, जेष्ठ कार्यकर्ते BSNLEU, टेलिकॉम फॅक्टरी यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम"
By

BSNLEU MH

Lorem ips
6

कॉम्रेड

आज टेलिकॉम फॅक्टरी, मुंबई येथे ए आय बी डी पी ए चे जिल्हा अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाच्या निमित्ताने कॉम्रेड रोहिदास दुधवाडकर यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीएसएनएल ई यू महाराष्ट्र परीमंडळाचे सचिव कॉम्रेड गणेश हिंगे, तसेच कॉम्रेड अविनाश लोंढे,जिल्हा अध्यक्ष AIBDPA मुंबई व कॉम्रेड रवी बाविस्कर जिल्हा सचिव, AIBDPA CN TX हजर होते. कॉम रवी बाविस्कर यांची  विकास संरक्षण समिती, (भारत सरकार रजि.), नवी दिल्ली च्या वतीने  महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक* राज्यासाठी कोअर कमिटी अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड नायकोडी जिल्हा अध्यक्ष बीएसएनएलईयू हे होते. मंचावर  कॉम्रेड संतोष मेजारी, जिल्हा सचिव बीएसएनएल ईयू, BSNLEU टेलिकॉम फॅक्टरी चे माजी परिमंडळ सचिव व AIBDPA  चे नेते कॉम्रेड सुनील चौधरी हे आवर्जून उपस्थित होते व त्यांनी सुंदर सूत्रसंचालन सुद्धा केले.  या कार्यक्रमात सर्वप्रथम एप्रिल 2022 ला सेवानिवृत्त होणारे BSNLEU चे ज्येष्ठ सदस्य कॉम्रेड रोहिदास दुधवाडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर काही ज्येष्ठ सदस्यांनी आपले अनुभव  दुधवाडकर यांच्या विषयी येथे मांडले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यता युनियन ऑफिस टापटीप ठेवणे आणि सोबत असलेला बगीचा कॉम दुधवाडकर यांनीनी कसा छान ठेवला ह्या बद्दल सर्व वक्त्यांनी भरभरून बोलले व त्यांचे मनापासून कौतुक केले. BSNLEU परिमंडळ सचिव यांनी सुद्धा परिमंडळ च्या वतीने कॉम रोहिदास दुधवाडकर यांना दीर्घायुष्य च्या शुभेच्छा दिल्या व सेवानिवृत्त झाल्यानंतर ही युनियन ऑफिस व बगीचा असाच सुंदर ठेवा अशी विनंती केली. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा ह्यासाठी कॉम तळपे, कॉम बने, कॉम वैगणकर व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

BSNLEU जिंदाबाद AIBDPA जिंदाबाद

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC