*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळाची विस्तारित परिमंडळ कार्यकारिणीची बैठक पुणे येथे उत्साहात पार पडली*

09-05-25
1 Min Read
By BSNLEU MH
73
*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळाची विस्तारित परिमंडळ कार्यकारिणीची बैठक पुणे येथे उत्साहात पार पडली* Image

*BSNLEU महाराष्ट्र परिमंडळाची विस्तारित परिमंडळ कार्यकारिणीची बैठक पुणे येथे उत्साहात पार पडली*

कॉम्रेड नमस्कार,

BSNLEU CHQ च्या सूचनेनुसार दिनांक 08.05.2025 रोजी विस्तारित परिमंडळ कार्यकारिणीची बैठक बाजीराव रोड टेलिफोन एक्सचेंज, पुणे येथे पार पडली. सर्व प्रथम शाखा सचिव, बाजीराव रोड ब्रँच यांनी CEC बैठकीला महाराष्ट्र मधून आलेल्या सर्व परिमंडळ कार्यकारणी सदस्य, जिल्हा सचिव व सक्रिय कार्यकर्ते यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलनच्या कार्यक्रम नंतर परिमंडळ अध्यक्ष कॉ नागेशकुमार नलावडे जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. सर्वप्रथम कॉ कौतीक बस्तेजी, परिमंडळ सचिव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. तातडीने ह्या बैठकीचे आयोजन का करण्यात आले व 20 मे ला होणाऱ्या देशव्यापी संपात आपण सर्वानी 100% सहभाग व्हावे असे आवाहन केले. तसेच संघटनेला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सढळ हस्ते मदत करावी. जेणेकरून CEC बैठक, संप, कोईम्बतुर अखिल भारतीय अधिवेशन इत्यादी कार्यक्रम पुढील काळात असणार आहे त्यामुळे संघटनेला आर्थिक पातळीवर सक्षम होणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी सढल हस्ते मदत करावी असे आवाहन केले व डोनेशन दिलेल्या सर्वांचे आभार मानले!.
त्यानंतर,
 कार्यक्रमात कॉम गणेश हिंगे, उपाध्यक्ष कॉ मोहम्मद जकाती, CS AIBDPA, कॉ युसुफ हुसेन, GS BSNL MH CCWF, कॉ संदिप गुळुंजकर, खजिनदार यांनी संप यशस्वी करण्यासाठी आपण काय भूमिका घ्यावी ह्या बद्दल सभेचे मार्गदर्शन केले. तसेच ह्या कार्यक्रमसाठी आलेल्या अनेक जिल्ह्यातील जिल्हा सचिव व परिमंडळ कार्यकारणी सदस्य व सक्रिय कार्यकर्ते यांनी आपली मते परखड पणे मांडली. नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांचे अनेक मुद्दे प्रलंबित असल्या बद्दल प्रत्येकाने नाराजगी व्यक्त केली. तरी सुद्धा आम्ही आपल्या जिल्हात जाऊन सभासदाचे मन वळवून संप यशस्वी करू अशी ग्वाही दिली.

दुपारी अवकाश भोजन नंतर कार्यक्रम चे मुख्य वक्ते कॉम अनिमेष मित्रा, अध्यक्ष BSNLEU CHQ यांनी सभेला मौलिक मार्गदर्शन केले.  जवळपास 80 मिनिटाच्या भाषणात त्यांनी प्रतिनिधी यांनी उपस्थित केल्या गेलेल्या मुद्द्यांवर CHQ ची भूमिका मांडली. 4 लेबर कोड , वेज रिविजन, डी ए मर्जर,नवीन NEPP, 4जी व 5जी साठी आत्मनिर्भर भारतचा हट्ट, देशातील श्रमिक वर्गाची स्तिथी, खोटा राष्ट्रवाद, देशातील प्रगतीमध्ये कामगार वर्गाची भूमिका अशा अनेक व विविध मुद्द्यावर सखोल मार्गदर्शन केले व सर्वाना संप यशस्वी करण्यासाठी आवाहन करत क्रांतिकारी लाल सलाम केला. अध्यक्षीय भाषण करतांना कॉ नागेशकुमार नलावडे जी यांनी परिमंडळची भूमिका स्पष्ट केली. गेल्या 45 वर्षे ट्रेड युनियन मध्ये काम करतांना आपल्याला हक्कासाठी संघर्ष कसा केला त्याचा लेखाजोखा मांडला. कामगारांचा खरे हित फक्त BSNLEU च करु शकते असे ठणकावून सांगितले. संस्थापक महासचिव कॉम नाम्बुंदरीजी यांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर आम्ही चालून  कर्मचारी वर्गाच्या हितासाठी ऐनवेळी संघर्षाची भूमिका सुद्धा घेऊ. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे सर्कल असून BSNLEU चा बालेकिल्ला आहे. आपण सर्वजण समन्वयातुन संप यशस्वी करू अशी भूमिका मांडली.
त्यानंतर बाजीराव रोड शाखेच्या वतीने डोनेशन रोख रक्कम ११०००/सर्कल युनियन ला जमा करुन दिले,!
या शाखेचे अध्यक्ष, सचिव तसेच किशोर गवळी व कमिटी मेंबर यांना सर्कल तर्फे बुके देऊन सन्मानित करण्यात आले.!
 कार्यक्रमाच्या शेवटी कॉ गणेश भोज, खजिनदार पुणे जिल्हा यांनी परिमंडळच्या सर्वांचे आभार मानले व संप यशस्वी होण्यासाठी योग्य ते पाऊल आपण सर्वांनी उचलावे अशी विनंती केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ विकास कदम, DS, कॉम संदीप गुळुंजकर, कॉ गणेश भोज, कॉ नितीन कदम, कॉ किशोर गवळी, कॉ श्यामा, कॉ मंदा मालांपल्ली, कॉ विजय झगडे, कॉ मगर, शाखा सचिव व अध्यक्ष बाजीराव रोड, शाखा व इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय मदत केली त्या बद्दल सर्कल च्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.