आवश्यक शैक्षणिक पात्रता असणार्‍या ड्राफ्ट्समन (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकॉम) साठी आणखी एक JTO परीक्षा घ्या - BSNLEU संचालक (HR) यांना पत्र लिहले.

26-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
197
3

2008 मध्ये, आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या ड्राफ्ट्समन (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकॉम) यांना 50% कोट्या मधून JTO (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) परीक्षेत बसण्याची परवानगी देण्यात आली.  राष्ट्रीय परिषदेच्या नॅशनल Council च्या 26व्या आणि 28व्या बैठकीत, व्यवस्थापनाने BSNLEU ची मागणी मान्य केली होती, बाकी ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकॉमसाठी आणखी एक JTO परीक्षा घेण्याची.  मात्र राष्ट्रीय परिषदेच्या या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.  बीएसएनएलईयूने याआधीही अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे.  पुन्हा एकदा BSNLEU ने आज संचालक (HR) यांना पत्र लिहून राष्ट्रीय परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

पी.अभिमन्यू, जीएस.