पुरेशा रिक्त पदांसह JTO LICE परीक्षा चे आयोजन करणे

20-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
186
पुरेशा रिक्त पदांसह JTO LICE परीक्षा चे आयोजन करणे
 Image

BSNLEU ने 07.08.2022 रोजी होणारी JTO LICE पुरेशा रिक्त पदांसह घेण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करत आहे. आजच्या बैठकीत श्री पी.के. पुरवार, सीएमडी बीएसएनएल, यांना चर्चेच्या दरम्यान कॉ.पी.अभिमन्यू, जीएस, यांनी मागणी केली की, 2021 च्या थेट भरती कोट्यातील पदे, जी सुमारे 890 पदांची संख्या येतात, ती देखील 07.08.2022 रोजी होणाऱ्या LICE साठी वळवण्यात यावी. पुढे, GS, BSNLEU ने निदर्शनास आणले की, 11 परीमंडळांमध्ये एकही जागा रिक्त नाही आणि आणखी 9 मंडळांमध्ये फक्त काही रिक्त जागा उपलब्ध आहेत. व्यवस्थापनाने योग्य यंत्रणा विकसित करून या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी GS, BSNLEU ने केली. सीएमडी बीएसएनएल यांनी एकाग्रतेने सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि व्यवस्थापन या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

पी.अभिमन्यू, जीएस.