कॉम्रेड पुष्पाताई फराटे, PGM Office, Pune यांचा वाढदिवस व सेवानिवृत्त निमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.
By

BSNLEU MH

Lorem ips
15

BSNLEU, पुणे च्या वतीने कर्तृत्ववान व दक्ष तसेच संचार सारथी विजेत्या कॉम पुष्पा ताई फराटे यांचा वाढदिवस व सेवानिवृत्त निमित्त कार्यक्रम चे दिनांक 28.05.2022 रोजी जोरदार आयोजन करण्यात आले. कॉम पुष्पा ताई फराटे हया पेन्शन विभागात कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी जवळपास 2200 पेन्शन केसेस निकाली काढल्या. त्यामुळे मोठया प्रमाणावर सेवानिवृत्त कर्मचारी ही हया कार्यक्रमत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सर्व वक्त्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील निरोगी व सुख-समाधानी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

ह्या कार्यक्रमासBSNLEU चे परिमंडळ अध्यक्ष व CHQ चे उपाध्यक्ष कॉम नागेश नलावडेजी, सचिव कॉम गणेश हिंगे, CCWF महासचिव कॉम युसूफ हुसेन हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी श्री भातम्बारे, PGM पुणे, विशेष अतिथी म्हणून सौ धानोरकर, तसेच कॉम युसुफ जकाती, अध्यक्ष BSNLEU पुणे, कॉम विकास कदम, सचिव, कॉम संदीप गुळुंजकर, ACS, श्री फराटे, श्रीमती हर्डीकर, प्रतिनिधी BMS , श्री अभिजित AO पेन्शन हे मंचावर उपस्थित होते. तसेच फराटे मॅडम यांचा संपूर्ण परिवार सुद्धा हया कार्यक्रम ला उपस्थित होता.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BSNLEU बाजीराव रोड शाखेने विशेष प्रयत्न केले. कॉम गणेश भोज व कॉम नितीन कदम यांच्या कल्पकतेने व आयोजना ने कार्यक्रमला विशेष रंगत आणली. महिला आघाडीच्या वतीने कॉम वृषाली दाभोलकर, कॉम मालांमपल्ली, कॉम कुलकर्णी, कॉम गांधी, कॉम देशपांडे व इतर सर्व महिलांनी विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. हया कार्यक्रम चे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती माया प्रभुणे यांनी केले.

 BSNLEU परिवार महाराष्ट्र