जुने पेन्शन धारक (मॅन्युअल PPO) असलेल्या सेवा निवृत्त कर्मचारी यांना संपन्न पेन्शन व्यवस्थेत सामावून घेण्याबाबत...
By

BSNLEU MH

Lorem ips
जुने पेन्शन धारक (मॅन्युअल PPO) असलेल्या सेवा निवृत्त कर्मचारी यांना संपन्न पेन्शन व्यवस्थेत सामावून घेण्याबाबत...  Image

बऱ्याच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे कडून फोन करून संपन्न पेन्शन साठी फॉर्म भरण्याबाबत विचारणा होत आहे. याबाबत CCA मुंबई कार्यलयात चर्चा करून आम्ही खुलासा करत आहोत की,  सध्या कोणत्याच प्रकारे संपन्न साठी पेन्शनर चे फॉर्म सी.सी.ए  कार्यालय, मुंबई (DOT Cell) ने भरून मागितलेले नाही आणि अशा प्रकारची कोणतीही ऑर्डर CCA ने जारी केलेली नाही ( फक्त कोलकाता CCA ला प्रयोगिक तत्वावर काही बदल सुरू आहेत). परंतु काही पेन्शनर च्या संघटना  चुकीची माहिती देऊन निवृत्त कर्मचारी यांना तसे फॉर्म भरून घेण्यास सांगत आहे व त्यासाठी 500 ते 1000 रुपयांची मागणी करत आहेत.

तरी अशी कोणतेही अधिकृत ऑर्डर नसल्यामुळे कोणीही असे फॉर्म  भरू नये. अशा स्वरूपाचे जर काही आदेश असतील तर ते आपल्याला वेळच्यावेळी कळवले जातील. काही सेवानिवृत्त कर्मचारीच्या संघटना हे पैसे जमवण्यासाठी व्यवसाय करत असाव्यात व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संभ्रमात टाकत असाव्यात. त्यामुळे अशा गोष्टीपासून आपण अलिप्त राहावे ही आपणांस विनंती ????

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC