कॉर्पोरेट कार्यालयाच्या पुनर्रचना शाखेद्वारे जारी केलेल्या पत्रांमध्ये, "व्यवसाय क्षेत्रांचे एकत्रीकरण" या शब्दाच्या जागी "SSAs चे विलीनीकरण" हा शब्द वापरला जात आहे. BSNLEU सतत व्यवस्थापनाला पत्र लिहित आहे आणि आग्रह करत आहे की, “व्यवसाय क्षेत्रांचे एकत्रीकरण” आणि “SSAs चे विलीनीकरण” हे एकच नाहीत. म्हणून, SSA चे विलीनीकरण हा शब्द "व्यवसाय क्षेत्रांचे एकत्रीकरण" या शब्दाचा पर्याय म्हणून वापरला जाऊ नये. याचे कारण असे की, “व्यवसाय क्षेत्रांचे एकत्रीकरण” हे SSA चे विलीनीकरण म्हणून स्वीकारले गेले, तर व्यवस्थापनाला SSAs मधून गैर-कार्यकारी ( Non एक्सएकटिव्ह) कर्मचारी यांची बदली करण्यास वाव मिळेल व नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी हा खूप मोठा धोका असेल. आज, BSNLEU ने या विषयावर संचालक (HR) यांना आणखी एक पत्र लिहिले आहे. कॉ.पी.अभिमन्यू, जीएस आणि कॉ.जॉन वर्गीस, उप. सरचिटणीस यांनी आज श्री अरविंद वडनेरकर, संचालक (एचआर) यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. संचालक (HR) यांनी ताबडतोब GM (Restg.) यांना SSAs चे विलीनीकरण हा शब्द व्यवसाय क्षेत्रांच्या एकत्रीकरणाच्या ठिकाणी न वापरण्याची सूचना केली.
पी.अभिमन्यू, जीएस.