*आता उठा कर्मचारी बंधू आणि भगिनींनो । कामगार संघटनेचे हात मजबुत करा.*

08-07-25
1 Min Read
By BSNLEU MH
70
IMG-20250708-WA0072

*आता उठा कर्मचारी बंधू आणि भगिनींनो । कामगार संघटनेचे हात मजबुत करा.*

कॉम्रेड नमस्कार,

उदयाचा देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी सर्व संघटनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. एक BSNL कर्मचारी म्हणून मी या संपात का सहभागी व्हावे ❓

1.BSNL मानजमेंट फक्त 15% फिटमेंट ला अडून बसले असतांना संघर्ष करून 30% फिटमेंट मिळवले.

2.महिला कर्मचारी यांचासाठी चाईल्ड केअर लिव्ह मिळवली.

3.68.8 IDA फिक्सअशन वरून 78.2 फिक्सअशन मिळवले.

4.नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी ज्यादा असल्याचा बेबनाव करत त्यांना कम्पलसरी रिटायरमेंट देण्याचा मानजमेंट चा डाव उधळून लावला.

5.BSNL मध्ये पगार अनियमित असतांना AUAB ची मोट बांधून कर्मचाऱ्यांना रेग्युलर पगार करण्यास मानजमेंट ला भाग पाडले.

6.अन्यायकारक ट्रान्सफर पोलिसी थांबविण्यासाठी संघर्ष केला. कुणालाही जिल्ह्यातून बाहेर जाऊन दिले नाही.

7.विभागीय परीक्षे घेण्यासाठी मानजमेंट वर दबाव आणून आणि त्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यात यश मिळवले.

8.ग्रुप टर्म इन्शुरन्स च्या माध्यमातून मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचा कुटुंबाला 20 लाख रुपये मिळवून दिले.

9.मेडिकल बिले मिळण्यासाठी विलंब होत असताना, सतत मानजमेंटशी भांडून बिल पायमेंट रेग्युलर करण्यास भाग पाडले.

10.J - 56 नियमानुसार कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्याची घातकी योजना हाणून पाडली.

*कॉम्रेड असे अनेक प्रश्न आपण बिकट परिस्थितीत असतांना सोडवले आहे. गेली 15 वर्षे BSNL तोट्यात असतांना आपण हे सर्व करू शकलो कारणकी संघटना आपल्या पाठीशी उभी होती म्हणून. 3रे वेज रिविजन व BSNL मार्फत 4जी व 5जी सेवा सुरु करण्यासाठी निरंतर संघर्ष केला आहे. अशी अनेक प्रश्न सोडविले आहेत व भविष्यात अजून अनेक प्रश्न आपल्याला भेडसावणार आहेत. अशा कठीण समयी आपण आपली ताकत दाखवली पाहिजे.* 

*आज आपला फक्त एक दिवसाचा पगार जाईल. परंतु 14  जुलै तारखेला वेज रिविजन ची महत्वपुर्ण बैठक आहे आणि हया बैठकीत मानजमेंटला आपली नाराजगी संपाच्या माध्यमातून जर दिसली तर वेज रिविजन अग्रीमेंट वर सह्या होतील. आपली नोकरी व पगार/भत्ते शाबूत राहतील व आपण सन्मानाने पुढील सेवा BSNL मध्ये करू. तर कोण काय म्हणत आहेत तिकडे लक्ष न देता मी हया कठीण समयी संघटना भक्कम करण्यासाठी काय केले पाहिजे हे याचा विचार आपण सर्वांनी करावा. आपल्या सर्वांना पुन्हा हात जोडून विनंती आहे की संप 100% यशस्वी करण्यासाठी आपण सहभाग घ्यावा.*

BSNL जिंदाबाद✊
कामगार संघटना जिंदाबाद✊
कर्मचारी एकता जिंदाबाद✊

              आपले नम्र 

कॉ कौतीक बस्ते  कॉ रंजन दाणी
CS BSNLEU    CS NFTE