20-Mar-2019

गोवा राज्याचे मुख्यमंत्री व माजी सरंक्षण मंत्री मा.पर्रीरकर यांना भावपूर्ण श्रन्धांजली..

बीएसएनएलइयु महाराष्ट्र परिमंडळ मा.पर्रीकर ,मुख्यमंत्री गोवा व माजी संरक्षण मंत्री यांना त्यांच्या दुखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रन्धांजली अर्पण करत आहे.

19-Mar-2019

दिनांक ५ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणारया मोर्च्यात हजारोने सहभागी व्हा.....

५ एप्रिल २०१९ रोजी दिल्ली येथे भव्य मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्याचे आयुब ने ठरविले आहे त्यासाठी प्रत्येक सर्कलला कोटा दिला आहे .महाराष्ट्रा आयुब साठी कमीतकमी ३०० सभासद ठरविले आहेत.

बीएसएनएलइयु महाराष्ट्र ने २०० सभासद पाठविण्याचे ठरविले आहे. तसेच महाराष्ट्र परिमंडळ प्रत्येक सभासदासाठी रुपये १५००/- प्रमाणे खर्च उचलणार आहे.तसेच एक दिवस राहणायची सोय सिएचक्यू करणार आहे.

तरी सर्व जिल्हा सचिवानी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातून पदाधिकारी/ दिनांक सभासद आणण्याचे काम करून मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा.

तसेच जिल्हा सचिवानी जे सभासद सहभागी होणार आहेत त्यांची नावे कॉ.नागेशकुमार नलावडे व कॉ जॉन वर्गीस यांच्याकडे दिल्लीतील सोयीसाठी वेळेत  व कॉ.गणेश हिंगे यांच्याकडे रुपये १५००/- प्रत्यकी  मिळविण्यासाठी  देण्यात यावी.सोबत सविस्तर सिएचक्यू चे निवेदन पत्र जोडत आहे.

-----------कॉ.नागेशकुमार नलावडे,सर्कल सचिव महाराष्ट्र.

View File

16-Mar-2019

बीएसएनएलईयूचे कॉरपोरेट ऑफिसच्या सर्कल युनियनवर शिस्तबंधाची कार्यवाही....बॉडी विसर्जित केली... - अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारणीने शिस्तबद्धतेचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल निर्णय घेतला ..

       बीएसएनएलईयू, कॉर्पोरेट ऑफिस मधील संपूर्ण  सर्कल युनियनने दिनांक १८/०२/२०१९ पासून झालेल्या ३ दिवसाच्या स्ट्राइकमध्ये सहभागी झाले नाहीत. तसेच दिनांक ०८ आणि ०९ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या २ दिवसांच्या सामान्य स्ट्राइकमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला नाही. हे उच्च निकायंच्या निर्णयांचे गंभीर उल्लंघन असून संघटनेच्या घटनेमध्ये बसत नाही.म्हणून आज दिनांक 15.03.2019 रोजी   बीएसएनएलईयूच्या अखिल भारतीय केंद्राच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. अखेरीस, अखिल भारतीय केंद्राने बीएसएनएलईयूच्या कॉर्पोरेट ऑफिस सर्कल युनियनला विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. पुढे, बैठकीने मंडळाचे पुनर्गठन करण्यासाठी महासचिवांना अधिकृत केले आहे..

 

14-Mar-2019

दि.०५ एप्रिल २०१९ रोजी संचार भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन ....

सरकार बीएसएनएलला संपविण्यासाठी व   रिलायन्स जियोला संपूर्ण टेलिकॉम मार्केट कॅप्चर करण्यासाठी एकप्रकारे सुविधा देण्याचे हळूहळू पावले टाकत आहे. डीओटी, हे  बीएसएनएलचे प्रशासकीय मंत्रालय आहे व ते  बीएसएनएलला समाप्त करण्याचे सरकारच्या निर्णयांची गांभीर्याने अंमलबजावणी करीत आहे. सरकार आणि दूरसंचार विभागाने उचलेली  पावलामुळे  बीएसएनएलला   गंभीर स्थितीत नेवून  ठेवले आहे. कर्मचार्यांना आज पगार मिळत नाही. डीओटी बीएसएनएलला त्याच्या परिचालन खर्च (ओपेक्स) साठी बँक कर्ज घेण्यास परवानगी देत ​​नाही. बीएसएनएलला सरकारकडून अंमलात आणल्या गेलेल्या कामांसाठी डीओटी जाणूनबुजून 2500 कोटी रुपये देत  नाही. निधीची कमतरता असल्यामुळे, बीएसएनएल वीज बिल भरण्यास सक्षम नाही, ज्यामुळे बीटीएस आणि एक्सचेंजमध्ये ईबी कनेक्शन्स डिस्कनेक्शन झाला आहे. यामुळे या सेवांवर गंभीरपणे परिणाम होत आहे. गेल्या तीन दिवसात एयूएबीने या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आणि या देशातील लोकांच्या सरकार आणि डीओटीच्या षड्यंत्रांना उघड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून, एचयएबीने 05.04.2019 रोजी संचर भवन येथे मोठ्या प्रमाणावर मार्च आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मंडळ आणि जिल्हा संघटनांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त कर्मचार्यांना रॅलीसाठी एकत्रित करावे आणि त्यांना ऐतिहासिक कार्यक्रम करावा.

 

            कॉ.नागेशकुमार नलावडे, सर्कल/ आयुब सेक्रेटरी महाराष्ट्र सर्कल

14-Mar-2019

एयूएबीच्या बैठकीत निर्णय ....

गेल्या तीन दिवसात, म्हणजे 12, 13 आणि 14 मार्च, 2019 रोजी एयूएबीने  सतत बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चालू आर्थिक संकट बीएसएनएलमधील व्यवस्थापनामुळे होत आहे, यामुळे आज  कर्मचार्यांना वेतन आणि बीएसएनएनला गुणवत्ता मिळत नाही. बीएसएनएलच्या सेवा दिवसेंदिवस खराब होत चालल्या आहेत, त्याबद्दल तपशीलवार चर्चा झाली. आजच्या बैठकीत सरकार, विशेषतः दूरसंचार विभाग, बीएसएनएल वाचवण्यासाठी कोणतीही मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यासाठी बीएसएनएलच्या विरोधात आहे.हि बाब निषेध करण्यासारखी आहे त्यामुळे या गोष्टीचा  निषेध करण्यात आले. परिमंडळ आणि जिल्हा सचिवांच्या माहितीसाठी आजच्या एयूएबी बैठकीत काही  निर्णय घेण्यात आले आहेत. निर्णय पत्र सोबत जोडत आहे.

सोबतचे परिपत्र पहा

View File

07-Mar-2019

खासदारांना निवेदन देताना कॉ.संजय नागणे व धुळे जिल्ह्यातील आयुबचे कार्यकर्ते.

07-Mar-2019

खासदारांना निवेदन देताना धुळे व पुणे जिल्ह्यातील आयुबचे कार्यकर्ते.

05-Mar-2019

मा.खासदारांना निवेदन देताना आयुबचे जिल्हासचिव, परिमंडळ पदाधिकारी व इतर कार्यकर्ते .

20-Feb-2019

तीन दिवसाचा संप यशस्वी ....सर्वांचे मनस्वी आभार ...!

 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सचिव,शाखा सचिव,परिमंडळ कार्यकारणी सदस्य व त्यांचे कार्यकर्ते यांनी हा ऐतिहासिक संप यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून यशस्वी केला याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या संघटनेच्या ग्रुपवर पाहिलेच आहे.

    या सर्वांचे महाराष्ट्र परिमंडळ तर्फे  खूप खूप आभार ...!    यापुढे हि लढ्यास हीच एकजूट असुद्या......!!!

                          धन्यवाद !!!

                      आपला:-    कॉ.नागेशकुमार नलावडे ,परिमंडळ सचिव

20-Feb-2019

महाराष्ट्र परिमंडळ मधील काही जिल्ह्यांनी मा.खासदारांची भेट घेवून आपल्या मागण्याचे निवेदून देवून या बाबत आग्रह धरण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची विनंती करण्यात आली.

Site updated by:

Com V N Auti ACS And Com John Verghese AGS

Circle Union Office Address:

BSNL ADMN Building,O/o CGMT MH Circle, BSNL Compound 3rd Floor B Wing, Santacruz west Mumbai 54

Email:

nageshkumar.nalawade@gmail.com

Copyright © BSNL Employee Union 2003 - 2018 Design & Developed By Joon Corporation Pvt. Ltd.