Hello BSNLEU ने वेतन पुनरावृत्ती ( Wage Revision ) समितीची बैठक घेण्यासाठी लवकर तारखेची मागणी करते.

BSNLEU ने वेतन पुनरावृत्ती ( Wage Revision ) समितीची बैठक घेण्यासाठी लवकर तारखेची मागणी करते.

21-04-24
1 Min Read
By BSNLEU MH
63
BSNLEU ने वेतन पुनरावृत्ती ( Wage Revision )  समितीची बैठक घेण्यासाठी लवकर तारखेची मागणी करते. Image

BSNLEU ने वेतन पुनरावृत्ती ( Wage Revision )  समितीची बैठक घेण्यासाठी लवकर तारखेची मागणी करते.

कॉम.  अनिमेश मित्रा, अध्यक्ष BSNLEU, आणि कॉम जॉन वर्गीस, कार्यवाहक सरचिटणीस, यांनी 19.04.2024 रोजी PGM (SR) ची भेट घेतली,  आणि पंधरवड्याच्या आत वेतन पुनरावृत्ती समितीची बैठक घेणे आवश्यक आहे असे सांगितले.  त्यांनी PGM (SR) ला विविध कॅडरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वेतन पुनरावृत्ती समितीच्या अध्यक्षांना सादर केलेल्या स्टेग्नाशन आणि वेतन नुकसानाच्या 30 थेट प्रकरणांची माहिती दिली.  ही प्रकरणे व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेल्या एकतर्फी वेतनश्रेणीबाबत नॉन एक्सएकटीव्ह संवर्गातील असंतोष अधोरेखित करतात.  प्रत्युत्तरात, PGM (SR) ने आश्वासन दिले की आपल्या युनियनने सादर केलेल्या प्रकरणांची सखोल तपासणी केल्यानंतर वेतन पुनरावृत्ती समितीच्या बैठकीची तारीख दिली जाईल.    -जॉन वर्गीस.  कार्यवाहक सरचिटणीस.  20.04.2024.